राजकुंद्राचा हा नवीन सिनेमा येत आहे

0
821

सध्या राज कुंद्राचा विषय काही दिवसांपासून चर्चेत आहे. पोर्नफिल्मची निर्मिती आणि वितरण केल्या प्रकरणी पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत राज कुंद्राला अटक केली आहे. आता ह्या प्रकारच्या सी-ग्रेड किंवा हॉरर पोर्न फिल्म्स बनवणारा राज कुंद्रा एकटाच होता का? त्याच्यासारखे आणि त्याच्या आधी अनेक सी-ग्रेड निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक होऊन गेलेत. सध्या अनेक असे OTT Platform आहेत जे सेमीपोर्न किंवा सॉफ्ट पोर्न प्रकारातला कंटेट दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करतात. रामसे बंधूं आणि त्यांच्यासारखे अनेक बी-ग्रेड सी-ग्रेड फिल्ममेकर्सने इंटरनेट क्रांती व्हायच्या कितीतरी वर्षांआधी असे हॉरर पोर्न फिल्म्स बनवल्यात. दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने रामसे बंधूंना केंद्रस्थानी ठेवुन Miss Lovely (2012) हा चित्रपट बनवला. 2012 साली Cannes International Film Festival च्या Director’s Fortnight section मध्ये वासेपूर प्रदर्शित होत असताना त्याच वर्षी Un Certain Regard section मध्ये Miss Lovely प्रदर्शित झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीचे दोन चित्रपट Cannes मध्ये प्रदर्शित झाले होते. Miss Lovely ह्या चित्रपटाला Best Feature film (Special Jury) आणि Best Production design असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. काही कारणांमुळे ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला आणि शेवटी जानेवारी 2014 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. रामसे बंधूंचं नाव न घेता सोनु दुग्गल आणि विक्की दुग्गल ह्या दोन भावांची कथा ह्यात मांडली आहे जे सत्तरच्या दशकापासून नव्वदच्या दशकापर्यंत सी-ग्रेड प्रकारातील चित्रपट बनवायचे.

माणुस जेंव्हा घरात एकटा असतो आणि घराचं सर्व नियंत्रण त्याच्या हातात असतो तेंव्हा तो जे काही करतो ते त्याच्या फँटसीचा एक छोटासा भाग जगण्याचा, त्याची हौस भागवण्याचा मनभरुन प्रयत्न तो करत असतो. ते त्या व्यक्तीचं तुमचं आमचं खरं रुप असतं. भारतीय लोकांच्या ह्याच फँटसीला गृहीत धरून अश्लील साहित्य आणि अश्लील चित्रपट (पोर्नोग्राफी) प्रत्येक दशकात वाढत गेलंय. काय अश्लील आहे आणि काय नाही हे समाज आधीच ठरवुन मोकळा होतो आणि समाजातल्या एका मोठ्या घटकाला (तसेच किशोरवयीन विद्यार्थी वर्गाला) एका मोठ्या वाचकवर्गाला सेक्स एज्युकेशनच्या अभावाने त्याविषयी कुतूहलातुन निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शिक्षकवर्ग, परिवार किंवा समाज देऊ शकत नाही तेंव्हा ही उत्तरं शोधण्यासाठी अश्लील साहित्य हाताळल्या जातं. अश्लील साहित्याला खरंच अश्लील म्हणावं की नाही हा वेगळा विषय आहे पण ह्या साहित्याचा खप हा प्रचंड मोठा आहे हे विसरून चालणार नाही. एखादं पुस्तक किंवा कवितासंग्रह छापण्यापेक्षा छपाईखान्याला अश्लील साहित्य छापण्यात जास्त फायदा असतो कारण की साहजिकच त्याला मागणी जास्त असते. सत्तर ऐंशीच्या दशकात ही मासिकं आणि साप्ताहिकं वाचणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये तर नुसते डोळे शेकुन घेणाऱ्यांची संख्या करोडोत होती. समवयस्क मित्रांचा एक मोठा गृप पुस्तकं कादंबऱ्या व्यतिरिक्त ही मासिके, साप्ताहिके आणि दैनिके आवडीने वाचत आलाय. नव्वदीच्या काळात व्हिडीओ रुम फोफावल्यानंतरही हैदोस, अंतर्वासना, मस्तरम सहित मिळतील ती इंग्रजी मासिके साप्ताहिके संग्रही ठेवणारा एक मोठा वाचक वर्ग देशात आधीपासून होता आहे आणि राहिल. व्हिडीओ रुम आणि ट्रिपल एक्स डॉट कॉम हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याआधी अनेक पुस्तकं, मासिकं, साप्ताहिकं ही जनमानसात पोहचली होती. देशातल्या एका अडाणी वाचकवर्गातर्फे वाचल्या आणि पाहिल्या जाणारा सर्वात मोठा विषय सेक्स होता. त्याविषयी असलेलं कुतूहल होतं. ह्या अडाणी वाचकवर्गाची शारीरिक भूक भागवण्याचं काम ह्या अश्लील साहित्याने त्या व्हिडीओ रुममध्ये लागलेल्या पोर्न फ़िल्मने केलंय. व्हिडीओ रूम सुरु होण्याआधीचा काळ देशातील एका मोठ्या वाचकवर्गाचा साक्षीदार आहे.

रामसे बंधूंच्या क्रांतिकारी भयपटानंतर भयकथा मिश्रीत सेक्स स्टोरी छापायची एक लाट आली होती. त्यात सुंदर भुतीन सोबत सेक्स करण्याची फँटसी रंगवण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नसेल पण एखाद्या इंग्रजी भाषेतील तथाकथित बेस्टसेलर पुस्तकापेक्षा दहा पट जास्त हातोहात विक्री त्या पुस्तकांची व्हायची. त्या अश्लील पुस्तकांचा वृत्तपत्रांचा मासिकांचा किंवा साप्ताहिकांचा संग्रह हा सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांच्या कपाटातही असतो हे वास्तव आहे. आज अनेक अश्लील म्हणवल्या जाणार्या वेबसिरीज आणि फ़िल्म OTT Platform वर उपलब्ध आहेत. अश्लील साहित्याकडे रसिक वाचकांचा ओढा लक्षात घेऊनच OTT वर आज सर्वाधिक पोर्नोग्राफीक कंटेट दाखवल्या जातोय त्याचं हे त्यामागचं मूळ कारण आहे.

रामसे बंधूंच्या फिल्मची हिरोईन हा देशातील प्रत्येक शहरातील प्रत्येक गावातील तरुण वर्गाच्या चर्चेचा विषय असायचा. ऐंशीच्या दशकात झपाट्याने फोफावणाऱ्या व्हिडीओ रुम चालकांना थिएटर मालक बनवण्याचं श्रेय रामसे बंधूंच्या क्रांतीकारी भयपटांना जातं. हिरोईनच्या विषयात रामसे बंधूंनी कधी कुठं तडजोड केलेली दिसून येत नाही. रामसे बंधूंच्या जवळपास झाडुनपुसुन सर्वच चित्रपटांचं कथानक उन्नीस बीस फरकाने सारखंच असायचं. त्या फिल्मचं एक बेसिक स्ट्रक्चर ठरलेलं होतं एक टेंपलेट ठरलेली होती. ह्या गोष्टी सर्रास रिपीट होत असताना त्यांनी भुतापेक्षा, हिरोपेक्षा, फिल्मच्या हिरोईन कडे जास्त लक्ष दिले. रामसे बंधूंविषयी मेनस्ट्रीम बॉलीवूडमध्ये कधी चांगल्या अर्थी चर्चा झाली नाही आणि त्यांच्यावर B-Grade शिक्का आधीपासुनच होता. पण रामसे बंधूंच्या भयपटांची क्रेझ देशभरात एवढी भयंकर होती की नंतर नंतर त्याच्याकडे बि-टाऊनला दुर्लक्ष करणं अवघड होऊन बसलं कारण त्यांचा स्वतःचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात ते यशस्वी झाले होते आणि नवीन प्रेक्षकवर्ग स्वतःकडे खेचण्यात सुद्धा यशस्वी झाले ते “विराना” फिल्म मुळे. रामसे बंधूंच्या डझनभर भयपटांच्या भाऊगर्दीत कल्ट ठरलेला विराना हा रामसे बंधूंच्या करीअरचा पिकपाँइंट होता. कदाचित हा त्यांच्या करीअरमधला एकमेव असा चित्रपट असेल ज्या चित्रपटाची तिकीटं देशभरात ब्लॅकने विकली जाऊ लागली. ह्याचं एकमेव कारण होतं “जास्मीन”. तिने या आगोदर दोन चित्रपटात काम केलं होतं पण तिथे तिच्या सहाय्यक भूमिकेला विशेष असा काही वाव नव्हता. विराना फिल्ममुळे जास्मीन रातोरात स्टार बनली. फक्त तिथं जास्मीनला पाहण्यासाठी अनेकांनी विराना आठ दहा वेळा थिएटरला पाहिला असेल. पत्र्याच्या शेडमध्ये VCR लावुन विराना सहित रामसे बंधूंचे डझनभर चित्रपट दाखवुन स्वतःला टुरींग टॉकिज म्हणवणाऱ्या टोळीचे पेव फुटले होते. गावोगाव फिरुन मोक्कार पैसा छापण्याची सुवर्णसंधी विरानामुळे टुरिंग टॉकीजवाल्यांना मिळाली होती. सिडी प्लेअर आल्यानंतरही विरानाची सिडी ज्याच्या संग्रही नाही असा जास्मीन लव्हर सापडणं मुश्कील होतं. आत्तापर्यंत सिंगल स्क्रिन थिएटर, व्हिडीओ रुम आणि टुरींग टॉकीजमध्ये सर्वाधिक चाललेला लोकप्रिय चित्रपट हा विराना होता. टिव्हीवर सुद्धा विरानाचे सॅटेलाइट राईट्स सर्वात आधी विकत घेण्यासाठी झी सिनेमाने त्या काळी करोडो खर्च केले होते. टिव्हीवर सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या हॉरर फिल्मच्या यादीत विराना नेहमी टॉप 5 मध्ये असतो आणि नेहमी असेल. इंडस्ट्रीत हॉरर फिल्मचा ट्रेंड सेट करणाऱ्या रामसे बंधूंना प्रेक्षकांची नाडी अचूक कळाली होती. प्रेक्षकांना नेमकं काय बघायला आवडतं हे सेंसॉर बोर्डाला फाट्यावर मारुन पद्धतशीरपणे दाखवण्याचं कसब त्यांच्यात होतं. लोकांच्या सेक्शुअल फँटसीची हौस भागवताना रामसे बंधू भयपटांच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करण्यात आघाडीवर असत. अनेक हॉलीवूड फिल्मचे bgm त्यांनी थोडाफार बदल करुन सरसकट ढापले पण मायबाप रसिक प्रेक्षकांची हौस भागवली. आपली फिल्म सुपर डुपर हिट होण्यासाठी वाट्टेल ती रिस्क घेण्यासाठी रामसे बंधू तयार असायचे. प्रत्येक Genre चा चित्रपट पाहणारा जसा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो तसा भारतात भयपट पाहणाऱ्या विखुरलेल्या एका प्रेक्षकवर्गाला साचेबद्ध करण्याचं आणि एक से बढकर एक हॉरर फिल्म देण्याचं काम रामसे बंधूंनी केलंय ह्या दुमत नाही. ह्याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं कथानक थोडं फार बदल करुन मांडलय. Miss Lovely हा चित्रपट युट्यूबवर रेंटने पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here